पठाणकोट : पंजाबमधून काश्मिरात एके 47 घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला. यावेळी तीन दहशतवाद्यांना अटक करून त्यांच्याकडून सहा एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या.
SSP Kathua: A truck carrying arms and ammunition has been recovered in Kathua, more details are awaited. #JammuAndKashmir https://t.co/LRfKQi3c3P pic.twitter.com/nvVTi2AcPg
— ANI (@ANI) September 12, 2019
जम्मू पठाणकोट मार्गावर सुरू असणाऱ्या नियमित तपासणीत एका ट्रकमध्ये सहा एके 47 रायफल्स जप्त करण्यात आल्या. हा ट्रक पठाणकोट (पंजाब) येथून श्रीनगरकडे जात होता. तपासणी नाक्यावर त्यातील शस्त्रसाठा आढळून आला. यातील तीघांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी दिली.