चिंचवड येथे होणार वितरण
पिंपरी (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे (पिंपरी-चिंचवड) संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास देण्यात येणारा अठरावा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांना शुक्रवारी (दि. 6) जाहीर झाला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुढील शनिवारी (दि. 14) सायंकाळी साडे पाच वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष (पिंपरी-चिंचवड) भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्काराचे वितरण क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. एक लाख 11 हजार रुपये रोख, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे 2002 पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे. देशपातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवधूत गुप्ते यांनी डिजिटल प्रभातसोबत साधलेला संवाद.