कोल्हापूर: दक्षिण मतदारसंघ म्हणजे कुरुक्षेत्र आहे आणि याच कुरुक्षेत्रा मध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याची घोषणा माजी मंत्री आणि विधान परिषदेचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत जाहीर मेळाव्यात बोलत होते. दरम्यान या मेळाव्यात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची उपस्थिती ही सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली.
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. सतेज पाटील आणि त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ की कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी ? या प्रश्नी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी सतेज पाटील यांनी सतेज संवाद. या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होत.
या मेळाव्याला अनेकांनी सतेज पाटील यांनी आपण दक्षिणमधून निवडणूक लढवावी आणि ऋतुराज पाटील यांनी उत्तर मधून निवडणूक लढवावी अशी मते मांडली. परंतु सतेज पाटील हे विधान परिषदेवर विद्यमान आमदार असल्यामुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील यांना आदेश दिल्यामुळे स्वतः सतेज पाटील विधान सभेची निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कॉंग्रेसमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.
काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या सतेज संवाद या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते त्यामुळे पाटील हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत हे काय अशी चर्चा होती. परंतु संजय मंडलिक यांनी या विषयाला पूर्णविराम देत कोल्हापूर दक्षिणमधून लढणाऱ्या ऋतुराज पाटील यांच्या सोबत आपण राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं स्पष्ट केलं.
एकूणच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आमल महाडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील या दोघांमध्ये निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होते.