मुंबई – मराठी चित्रपटसृष्टी मधील अभिनेता ‘अंकुश चौधरी’ लवकरच एक रोमँटिक विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यावेळी अंकुश एकटा नव्हे तर चक्क ‘ट्रिपल सीट’ येत आहे. नुकतंच अंकुशच्या आगामी ‘ट्रिपल सीट’ चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ असं टॅगलाइनखाली देण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये हातात बासरी धरलेल्या श्रीकृष्णाच्या पोझमध्ये अंकुश चौधरी दिसत आहे. आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन अभिनेत्री उभ्या राहिलेल्या दिसत आहेत.
https://www.facebook.com/ankushchaudhariofficial/videos/458281394762566/
‘ट्रिपल सीट’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांचे आहेत. हा चित्रपट दिवाळी मध्ये प्रदर्शित होणार असून, हा एक रोमॅंटिक कथानक असल्याचे दिसत आहे.