इरा कुलकर्णी, समृद्धी वैकर, भावना बोरा, स्मिता मेस्त्री, अनुजा कुलकर्णी विजेत्या
नगर – श्रुती संगीत निकेतन या संस्थेतर्फे ज्येष्ठ गायिका अभिनेत्री स्व. जयमाला शिलेदार यांना समर्पित व स्व. दत्तात्रय देशपांडे स्मृती प्रित्यर्थ आयोजित शास्त्रीय व सुगम गायन स्पर्धा नुकत्याच चतुर्वेद भवन येथे झाल्या. त्यात सुगम गायन शालेय गटात इरा कुलकर्णी, शास्त्रीय गायन मध्यमा गटात समृद्धी वैकर , सुगम गायन खुल्या गटात (विभागून) स्मिता मेस्त्री व भावना कासवा-बोरा व शास्त्रीय गायन विशारद व अलंकार गटात अनुजा कुलकर्णी यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहेत.पारितोषिक वितरण समारंभ स्व. दत्तात्रय देशपांडे यांचे चिरंजीव सातारा येथील प्रख्यात डॉक्टर जयंत देशपांडे यांच्या हस्ते झाला.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रामाणिक रियाज, कलेवरील श्रद्धा व गुरुंवरील निष्ठा असल्यास संगीत कला येणे अवघड नाही असे वक्तव्य केले. तसेच त्यांनी स्व. दत्तात्रय देशपांडे यांच्या सांगीतिक कार्याविषयी उपस्थितांना संबोधित केले. त्याचप्रमाणे श्रुती संगीत निकेतनचे अध्यक्ष डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या परिक्षणाचे काम सौ. अनुजा कुलकर्णी व नीता प्रथमशेट्टी यांनी केले. माधवी ऋषी, श्रद्धा देशपांडे, सुपर्ण प्रताप, आनंद कुलकर्णी , प्रसाद सुवर्णपाठकी व नेहा भिंगारदिवे यांनी साथसंगत केली. प्रचिती खिस्ती यांनी सूत्रसंचालन केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दीपा पारनाईक, डॉ. धनश्री खरवंडीकर , अक्षता भंडारी , रिद्धी कुलकर्णी , संस्कृती कुलकर्णी, शांतनू भूकन यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी डॉ. सुजाता देशपांडे , किर्तीदेवी खरवंडीकर, दीपक शर्मा , भूषण भणगे, डॉ. अभिजीत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे –
सुगम गायन – शालेय गट- प्रथम क्रमांक- इरा कुलकर्णी द्वितीय क्रमांक-सार्थक शर्मा तृतीय क्रमांक-ईशान बल्लाळ, उत्तेजनार्थ- मुग्धा मुळे आणि स्वानंदी जोशी.
सुगम गायन- खुला गट- प्रथम क्रमांक ( विभागून) – भावना कासवा-बोरा, स्मिता मेस्त्री द्वितीय क्रमांक- सुरेखा गायकवाड तृत्तीय क्रमांक- प्रिया कुलकर्णी उत्तेजनार्थ- सुजाता नेने व अश्विनी भणगे.
शास्त्रीय गायन- मध्यमा प्रथम व पूर्ण गट-प्रथम क्रमांक- समृद्धी वैकर,द्वितीय क्रमांक- प्रतीक्षा काळे ,तृतीय क्रमांक- संस्कृती कुलकर्णी उत्तेजनार्थ – रिद्धी कुलकर्णी व नेहा भिंगारदिवे ,शास्त्रीय गायन – विशारद व अलंकार गट- प्रथम क्रमांक- अनुजा कुलकर्णी, व्दितीय क्रमांक- प्रचिती खिस्ती,तृतीय क्रमांक- माधवी ऋषी, उत्तेजनार्थ- श्रध्दा देशपांडे व दीपा पारनाईक.