मुंबई : अभिनेता संजय दत्त येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आले होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
येत्या 25 सप्टेंबर रोजी अभिनेता संजय दत्त पक्षात प्रवेश करणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. संजय दत्त यांच्यासारखी माणसं आपल्या पक्षात येत असून चित्रपट क्षेत्रसुद्धा आम्ही कव्हर करत असल्याचेही जानकर म्हणाले. एवढेच नाही तर खुद्द संजय दत्त यानेदेखील एक व्हिडीओतून रासपच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत त्यांनी महादेव जानकर हे माझे भाऊ आहेत, तसेच त्यांना माझ्या खुप शुभेच्छा असे संजयने म्हटले आहे.