अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतील इयत्ता अकरावीसाठी सुरू असलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीकरिता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

20 ऑगस्टपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील प्रवेश फेरी सुरू करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट रोजी दहिहंडी उत्सवानिमित्त मुंबईसह काही ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. या फेरीअंतर्गत एकूण तीन गट तयार करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गट क्रमांक 1 मध्ये दहावीच्या परीक्षेत 80 ते 100 टक्‍के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी, गट क्रमांक 2 मध्ये 60 ते 100 टक्‍के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी, गट क्रमांक 3 मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी याप्रमाणे समावेश करण्यात आला आहे.

आता गट क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांसाठी सोमवारी (दि.26) महाविद्यालयांनिहाय रिक्त जागा ऑनलाइन प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी 27 व 28 ऑगस्ट रोजीची मुदत देण्यात आली आहे. यानंतर 28 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वा. सर्व रिक्तजागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)