लासुर्णे – बोरी (ता. इंदापूर) येथे विवाहितेचा छळ करुन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सागर भागवत मरळे, भागवत कृष्णा मरळे, मालन भागवत मरळे, दिपक भागवत मरळे व ज्योती दीपक मरळे (रा. सर्व बोरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गौरी सागर मरळे (वय 25, रा. बोरी; सध्या रा. नातेपुते, ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली. 8 जानेवारी 2015 ते 31 ऑगस्ट 2018च्या दरम्यान गौरी हिला माहेराहून नवीन चारचाकी गाडी घेण्याकरीता तीन लाख रूपये आणण्यासाठी छळ केला. तसेच तिच्या इच्छेविरूद्ध बारामतीत खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला.