लासुर्णे – वालचंदनगर पोलिसांनी बेकायदेशीर देशी दारू व हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून जंक्शन, निरवांगी व शेळगाव परिसरातील चौघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार (दि. 15) जंक्शन जवळील एस. आर. हॉटेल येथे छापा टाकून 1615 रुपयांची दारु जप्त केली. याप्रकरणी मंगेश अरुण गायकवाड (रा. लासुर्णे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निरवांगी येथे शुक्रवारी (दि. 16) ओढ्यालगतच्या झाडीमधील दारुच्या अड्ड्यावर छापा टाकून 624 रुपयांची देशी दारु जप्त केली.
यात प्रशांत भीमराव पोळ (रा. निरवांगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि. 16) शेळगाव येथील दारुअड्ड्यावर छापा टाकून 1248 रुपयांची देशी दारु व पाचशे रुपयांची गावठी दारु जप्त केली. यात बबई भीमराव मदने व मनिषा मल्हारी खोमणे (रा. दोघी शेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.