वाघळवाडी (प्रतिनिधी) – देशाच्या 73 व्या स्वांतत्र्यदिनामित्त काकडे महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थीकेंद्रीत उपक्रम राबविले. महाविद्यालयातील अपंग विद्यार्थिनी कु.जयश्री जोजारे यांच्या हस्तेझेडा वंदन करण्यात आले.
दरम्यान, या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. सोमप्रसाद केंजळे, पोलीस उपनिरीक्षक साळुके, उपप्रचार्य, प्राध्यापक वर्ग आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते