पुणे – पोलीस वसाहतीतील घरांच्या डागडुजीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केल्याची घोषणा महसूल आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.
पोलीस वसाहतीतील गळक्या घरांची समस्या नुकतीच समोर आली होती. पण, आता या घरांच्या डागडुजीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस आयुक्तालयाकडून प्रभावी पोलीस प्रशासनाचे आकलन आणि अपेक्षांबद्दल
सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी सिंबायोसिस अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
याचा अहवाल तसेच पोलिसांच्या “सेवा’चे (सर्व्हिस एक्सलन्स ऍन्ड व्हिक्टिम अस्टिटन्स) लोकार्पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पाटील बोलत होते. खासदार गिरीश बापट, डॉ. शां. ब. मुजमदार, राज्यमंत्री संजय भेगडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.