नवी दिल्ली : आत देशात स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. या सणांचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत आहे. तर तिकडे ज्यांच्यामुळे आपण हे सर्व आनंदात साजरे करू शकतो असे आपले जवान सीमेचे रक्षण करत आहेत. दरम्यान, आज साजरा होत असलेला भावा-बहिणीचा प्रेमळ सण म्हणजे रक्षाबंधन सीमेवरील जवानांनीदेखील साजरा केला. मात्र, यंदा जवानांनी हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
राजस्थानच्या सीमेवरील बीएसएफच्या जवानांनी चक्क सीमेवर असणाऱ्या तारांनाच राख्या बांधत आमचे रक्षण कर असे म्हटले आहे. कोणत्याही मोठ्या सणांच्या वेळी लष्कराचे जवान सीमेवर थांबून देशाचे संरक्षण करत असतात त्यामुळे आपण ते सण उत्साहात पार पाडतो. बीएसएफच्या जवानांनीदेखील असाच उत्साह सीमेवी दाखवला आहे त्यामुळेच त्यांनी सीमेच्या तारांना राखी बांधली आहे. तसेच तु असताना आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही असे म्हटल्याचे दिसत आहे.