पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
नवी दिल्ली: देशाच्या 73 व्या स्वांतत्र्यदिनामित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केले. यावेळी त्यांनी मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या सर्वच गोष्टींचा आपल्या भाषणात उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा करत संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे म्हटले. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
PM Modi: Our security forces are our pride. To further enhance coordination between our forces, I announce a big decision today,India will now have a Chief of Defence Staff- CDS. This is going to make the forces even more strong pic.twitter.com/sLH3wnuyrp
— ANI (@ANI) August 15, 2019
सध्या जग वेगाने बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या चीफ ऑफ स्टाफ पद अस्तित्वात आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटीत तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. यातील वरिष्ठ सदस्याकडे समितीचे चेअरमनपद दिले जाते. चीफ ऑफ डिफेन्स पद निर्माण केल जावं अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी हा मोठा निर्णय घेतला. भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानवर मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. जगात सध्या असुरक्षेचं वातावरण आहे. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागावर चिंतेचं सावट आहे. काही भागातून दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. मात्र भारत अशा शक्तींविरोधात ठामपणे उभा आहे आणि यापुढेही राहील, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला.