मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सचिन अहिर यांनी बुधवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. यामुळे राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडणार हे निश्चित मानले जात आहे.
तत्पूर्वी, सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे अशीच साथ पुढे कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच रात्रीच्या सुमारास त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अकरा वाजता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी ११ वाजता सचिन अहिर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील.