पाकिस्तानात 40 दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची दिली माहिती
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर दहशवतवादावर आपली कबुली दिली आहे. पाकिस्तानमध्ये 40 विविध दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे खान यांनी म्हटले आहे. तसेच मागील 15 वर्षांमध्ये पाकच्या सरकारने ही माहिती अमेरिकेला दिली नसल्याचेही खान यांनी म्हटले आहे.
कॅपिटल हिलमध्ये नागरिकांना संबोधित करतेवेळी त्यांनी पाकिस्तानमधील खरी परिस्थिती मांडली. आम्ही सध्या अमेरिकी युद्धाशी जोडले गेलो असून 9 11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नव्हता तसेच त्यावेळी अलकायदा ही संघटना अफगानिस्तानमध्ये कार्यरत होती. तसेच ज्यावेळी देशात काही चुकीच्या घटना घडल्या त्यासाठी आम्ही आमच्या सरकारला जबाबदार धरतो असे सांगत त्यांनी देशातील दहशतवादावर आपली नाराजीदेखील व्यक्त केली.