मुंबई: महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगाव सीमाप्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा बेळगाव सीमाप्रश्नावर आक्रमक होणार आहे. तसेच शिवसेनेचे खासदार लवकरच बेळगावचा दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून आता शिवसेना पुन्हा एकदा या विषयावर आक्रमक दिसत आहे. या प्रश्नाला गती देण्यासाठी नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक उच्चस्तरीय बैठकी झाल्या मात्र हा प्रश्न अजून मार्गी लागला नाही.