पंजाब – आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेले माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
My letter to the Congress President Shri. Rahul Gandhi Ji, submitted on 10 June 2019. pic.twitter.com/WS3yYwmnPl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) July 14, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा १० जून रोजी दिला असून याबाबत सविस्तर माहिती त्यांनी आज ट्विटद्वारे सांगितली आहे. राजकीय पेचामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला असावा अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. मात्र सिद्धू यांचा राजीनामा देण्यामागील नेमका तपशील समजू शकला नाही.