#CWC2019 : भारतीय चाहत्यांनी तिकिटे विकावीत – जेम्स नीशाम

इंग्लंड – भारताचे विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी अंतिम सामन्याची तिकिटे विकावीत असे आवाहन न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशामने केले आहे.

भारत अंतिम फेरीत स्थान मिळविणारच अशी खात्री वाटल्यामुळे अनेक भारतीय प्रेक्षकांनी अंतिम सामन्याच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण केले आहे. न्यूझीलंड संघ अंतिम सामना खेळेल अशी त्यांच्या चाहत्यांनी अपेक्षाही केली नव्हती. हा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना तिकिटे अपुरी पडू लागली आहेत.

न्यूझीलंडचे चाहते वाटेल त्या किमतीला अंतिम सामन्याची तिकिटे घेण्यासाठी तयार असल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रेक्षकांना तिकिटे परत करावयाची असल्यास त्यांना या तिकिटांचा परतावा मिळू शकेल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले आहे. त्यामुळेच नीशामला भारतीय प्रेक्षकांकडून तिकिटे परत होण्याची आशा वाटत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.