पिंपरी – मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे माहेरी गेलेली पत्नी जास्त दिवस माहेरला राहिल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून सासू-सासऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडिीत पत्नीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे. त्यानुसार शिवकुमार बनस्प्पा कोन्नुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही तिच्या मुलांना शाळेला सुट्टी लागल्यानंतर माहेरी गेली होती. माहेरी गेल्यानंतर त्या जास्त दिवस राहिल्याने तिच्या पतीने फोन करुन “तु घरी येवू नकोस, माहेरीच रहा’ असे म्हणाला. तसेच फोन न उचलल्यामुळे शिवकुमार याने अश्लिल मेसेज पाठवले व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.