भोसरी एमआयडीसीत टेम्पो चोरीला

भोसरी – कंपनीच्या बाहेर उभा असलेला ऍपे थ्री व्हीलर मालवाहु टेम्पो अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. ही घटना बुधवार (दि. 3) सायंकाळी पाच ते गुरुवार (दि. 4) सकाळी नऊच्या दरम्यान घडली. शिवा हनुमंत पुजारी (वय-28, रा. धनाजी लांडगे चाळ, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शिवा यांनी त्यांचा ऍपे थ्रीव्हीलर मालवाहु टेम्पो (एमएच 14, एएच 1606) हा पार्क केला होता. यावेळी अज्ञात चोरट्याने तो टेम्पो चोरुन नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.