दापोडीत अनधिकृत बांधकामावर हातोडा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दापोडी व परिसरातील एकूण पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 263 चौरस मीटर बांधकाम पाडण्यात आले.

प्रभाग क्रमांक 30 मधील पवारवस्ती, गणेशनगर, दापोडी या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाई महापालिकेचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, चार बीट निरिक्षक, 10 मजूर, पाच पोलीस उपनिरिक्षक, तीस पोलीस कर्मचारी व 10 मजूर सहभागी झाले होते. या कारवाईसाठी एक डंपर, एक जेसीबी आणि एक ब्रेकरचा वापर करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.