भुवनेश्वर – भारताने तुल्यबळ जपानचा 7-2 असा दणदणीत पराभव केला आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. शनिवारी होणाऱ्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडणार आहे.
FT: 🇮🇳 7-2 🇯🇵
After conceding an early goal, India didn't look back and registered an emphatic win with a flurry of strikes throughout the 60 minutes!#IndiaKaGame #FIHSeriesFinals #RoadToToTokyo #INDvJPN pic.twitter.com/8sby1NKpaW
— Hockey India (@TheHockeyIndia) June 14, 2019
भारताने मध्यंतराला 4-2 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला जपानच्या केनजी किटाझातो याने गोल करीत झकास सलामी केली. मात्र, सातव्या मिनिटाला हरमानप्रीतसिंग याने गोल करीत बरोबरी साधली.
वरूणकुमार याने 14 व्या मिनिटाला भारतास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. जपानच्या वातानाबे कोता याने 20 व्या मिनिटाला गोल नोंदवित 2-2 अशी बरोबरी केली. त्यानंतर भारताने जोरदार चाली व भक्कम बचाव असा खेळ करीत वर्चस्व गाजविले. रमणदीपसिंग (23 वे व 37 वे मिनिट), हार्दिकसिंग (25 वे मिनिट), गुरसाहेबजितसिंग (43 वे मिनिट) व विवेक सागरप्रसाद (47 वे मिनिट्) यांनी भारतास सहज विजय मिळवून दिला.
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला 2-1 असे पराभूत केले. भारत व आफ्रिका या दोन्ही संघांनी ऑलिंपिकच्या पात्रता स्पर्धेत स्थान मिळविले. ही स्पर्धा यंदा ऑक्टोबरमध्ये होणार आहे.