मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना यांचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई देखील केली आहे. विशेष म्हणजे या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘भारत’ अग्रस्थानी आहे.
Special screening of #Bharat for the real families who experienced the events of 1947 and the partition. Honoured to meet all of them! Salute to the real #Bharat families pic.twitter.com/sThayWsMZr
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 12, 2019
दरम्यान, याच सक्सेचा आनंद साजरा करण्यासाठी सलमानने ‘भारत’ चित्रपटाच्या एका स्पेशल शोचे आयोजन केले होते. सलमाने अश्या व्यक्तींसाठी चित्रपटाच्या शोचे आयोजन केले होते कि, ज्यांनी स्वतः भारत- पाकिस्तान फाळणीचे दुःख झेलले आहे. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी स्वतः सलमान खान देखील या व्यक्तींबरोबर चित्रपट गृहात उपस्थित होता. याबद्दल सलमानने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सलमानचे हे पोटो सोशल मीडियावर जोरदार व्हारल होत आल्याचे दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/ByntQJ2HFIm/?utm_source=ig_web_copy_link