पुणे – स्वीडनमधील हेल्सीगबोर्गमध्ये होणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी पुण्यातील गौरव घुले हा भारताकडुन खेळण्यासाठी रवाना झाला आहे. गौरवने वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
सलग तीन वर्षे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण कामगिरी केली आहे. नुकत्याच मंगोलिया येथे झालेल्या एशिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळविले होते. एशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून भारताची मोहर उमटवली होती.