पिंपरी -शाळेतून दहावीचा निकाल आणतो, असे सांगून घराबाहेर पडलेला विद्यार्थी शनिवार (दि.9) पासून बेपत्ता आहे. ही घटना पिंपळे गुरवमध्ये घडली. याप्रकरणी 65 वर्षीय आजीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणारा 16 वर्षीय मुलगा त्याच्या आजीसोबत सांगवी परिसरात राहत होता. शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. पिंपळे गुरव येथील प्राथमिक शाळेतून निकाल घेऊन येतो असे आजीला सांगून तो घराबाहेर पडला. मात्र तीन दिवसानंतरही तो घरी परतला नाही.