टॉन्टन – विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या न्यूझीलंडची आज टॉन्टन येथील काउंटी मैदानावर अफगाणिस्तानबरोबर लढत होणार असून या लढतीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे. यंदा त्यांनी आतापर्यंत पहिले दोन सामने जिंकताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र बांगलादेशविरुध्दच्या लढतीत विजय मिळविण्यासाठी त्यांना थोडासा संघर्ष करावा लागला होता.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडने जिंकला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
🗣️TOSS NEWS#KaneWilliamson has opted to bowl against Afghanistan in Taunton.
Ikram Ali Khil, Aftab Alam and Noor Ali Zadran come in for 🇦🇫, while 🇳🇿 have retained the same XI. #AFGvNZ#BACKTHEBLACKCAPS#AfghanAtalan pic.twitter.com/PzO9O639MP
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 8, 2019
प्रतिस्पर्धी संघ –
अफगाणिस्तान –
हज़रतुल्लाह, नूर अली, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, मोहम्मद नबी, गुल्बदिन नाएब, नजीबुल्लाह ज़ादरान, इकराम अली ख़िल, राशिद ख़ान, आफ़ताब आलम, हामिद हसन
न्यूझीलंड –
मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट