8 लाख 8 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नगर – नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. टोळीकडून हत्यारासह 8 लाख 8 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिल रघुनाथ बनसोडे, (वय-38, मुळ रा. 191, इजोरा, ता. वाशिम, जि.उस्मानाबाद, हल्ली रा. फ्लॅट क्र. 108, साई व्हीलेज सोसायटी, यवत, ता. दौंड), सुनिल चंद्रभान हळनोर, वय-33, रा. साईनाथ नगर, नेवासा फाटा, ता. नेवासा, जि.नगर), श्रीकांत मिनानाथ जगदाळे, (वय-31, रा. करडे, ता. शिरुर, जि.पुणे), जयकुमार सुभाष कुलकर्णी, वय-26, रा.कोयाळी गांवठाण, शिक्रापुर,ता.शिरुर, जि.पुणे), आवेश शफिक शेख,(वय-21, रा.दिवनमळा, ता.शिरुर, जि.पुणे), अभिषेक नक्षेद पाठक, (वय-26, मुळ रा. भदीमा, ता, जि. वाराणसी) यांच्यासह तसेच कार नंबर एम.एच-17-एजे-6334 ताब्यात घेतली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात असलेल्या हॉटेल हिंदजीत समोर, दोन पांढऱ्या रंगाच्या कारमधील इसम दरोडा घालण्याचे उद्देशाने संशयीत रित्या दबा धरुन बसले असल्याची माहिती पवार यांच्या पथकाला समजली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक गोकूळ औताडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रोहन खंडागळे, सोन्याबापू नानेकर, आण्णा पवार, दिनेश मोरे, दिंगबर कारखेले, मल्लिकार्जून बनकर, देवेंद्र शेलार, किरण जाधव, सुरज वाबळे, चालक बाळसाहेब भोपळे यांनी सापळा रचून दरोडेच्या तयारीतील आरोपींन कडून कार नं.(एमएच-25.आर.3009) दोन कोयते, एक लोखंडी गज, एक लाकडी दांडके, सुती दोरी जप्त करण्यात आले. देवेंद्र दिलीप शेलार यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.