रमेश देसाई मेमोरियल राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
मुंबई – क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित योनेक्स सनराईज एमएसएलटीए 13व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात चिराग दुहान, धृव तंग्री, कृष्णा हुडा, करण सिंग यांनी तर मुलींच्या गटात संजना सिरीमल्ला, रेनी सिंगला, परी सिंग व नैशा श्रीवास्तव या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात हरियाणाच्या दुस-या मानांकीत चिराग दुहान याने महाराष्ट्राच्या अनर्घ गांगुलीचा 6-2, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पंजाबच्या चौथ्या मानांकीत धृव तंग्रीने महाराष्ट्राच्या साहेब सोधीचा 6-3, 6-1 असा तर चंदीगडच्या पाचव्या मानांकीत कृष्णा हुडाने चंदीगडच्याच अजय सिंग याचा 6-2, 6-0 व हरियाणाच्या नवव्या मानांकीत करण सिंगने मध्यप्रदेशच्या आयुष्मान अर्जेरीयाचा 6-0, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात उपांत्यपुर्व फेरीत तेलंगणाच्या अव्वल मानांकीत संजना सिरीमल्ला हीने गुजरातच्या दिया भारव्दाजचा 6-4, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हरियाणाच्या सातव्या मानांकीत रेनी सिंगलाने गुजरातच्या विधि जानीचा 6-0, 6-2 असा, तर हरियाणाच्या आठव्या मानांकीत परी सिंगने कर्नाटकच्या रेश्मा मरूरीचा 6-1, 6-2 असा व कर्नाटकच्या नैशा श्रीवास्तवने महाराष्ट्राच्या भुमीका त्रिपाठीचा 6-3, 6-1 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुहेरीच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात कर्नाटकच्या निखिल निरंजनने मध्यप्रदेशच्या डेनिम यादवच्या साथीत मध्यप्रदेशच्या दिप मुनीम व महाराष्ट्राच्या अर्जून गोहड या जोडीचा 6-4, 7-6(1) असा टायब्रेकमध्ये पराभव करत दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रेवेश केला. तसेच चंदीगडच्या अजय सिंगने कृष्णा हुडाच्या साथीत दिल्लीच्या सॅम चावला व आसामच्या आकाश देव याचा 6-2, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ऋतूजा चाफळकर व हृदया शहा या जोडीने महाराष्ट्राच्याच सई भोयार व ईशीता जाधव यांचा 6-3, 6-0 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर हरियाणाच्या रेनी सिंगलाने महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरच्या साथीत तमिळनाडूच्या लक्ष्मी अरुणकुमार व कार्तिका विजय यांचा 6-0, 6-3 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.