मध्य प्रदेश – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभा निवणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्हा अधिकाऱ्याला धमकीवजा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवराज सिंह चौहान छिंदवाड्यातील उमरेठ या गावात हेलीकॉप्टरद्वारे जाणार होते मात्र , या हेलीकॉप्टरला उतरवण्याची परवानगी तेथील जिल्हा अधिकाऱ्याने मंजूर केली नाही. यामुळे शिवराज सिंह चौहान हे उमरेठ या गावात हायवेद्वारे पोहचले. त्यांनी जनसभेत जिल्हा अधिकाऱ्याला धमकी दिली की, ‘पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी हेलीकॉप्टरला उतरवण्याची परवानगी देत नव्हत्या, आता कमल नाथ दादा देखील असेच करत आहेत. पण ये ‘पिट्ठू’ कलेक्टर तू ऐकून घे आमची पण वेळ येणार आहे.’
#WATCH Shivraj Singh Chouhan: “Bengal mein Mamata didi, vo nahi utarne de rahi thi, Mamata didi ke baad Kamal Nath dada……Ye pithu collector sun le re, humare din bhi jaldi ayenge, tab tera kya hoga?”. He was allegedly denied permission to land chopper in Umreth, MP after 5 pm pic.twitter.com/r8ej6ZDDV1
— ANI (@ANI) April 24, 2019