शाहरुख 20 वर्षांनंतर पुन्हा व्हिलन

शाहरुखच्या करिअरमध्ये तो रोमॅंटिक हिरो म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी त्याच्या करिअरचा एक मोठा पॅच त्याने “व्हिलन’म्हणून गाजवला आहे. विशेषतः तिहेरी लव्हस्टोरी आणि बदला या दोन अवगुणांच्या आधारे त्याने किमान अर्धाडझन सिनेमांमध्ये खलनायक रंगवला आहे. प्रेक्षकांनी त्याचा रोमॅंटिक हिरो जेवढा पसंत केला आहे, त्यापेक्षाही त्याच्या या व्हिलनला अधिक पसंती मिळाली आहे. “डर’, “अंजाम’, “कभी हां कभी ना’, “बाझिगर’ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. आता जवळपास 20 वर्षांनी शाहरुख पुन्हा एकदा व्हिलन साकारण्याच्या तयारीत आहे.

तामिळमधील सुपरस्टार विजयबरोबर “थलपती’ हा शाहरुखचा तमिळमधील दुसरा सिनेमा असणार आहे. यापूर्वी कमल हासन यांच्या लीड रोलमधील “हे राम’मध्ये शाहरुखचा छोटासा पण महत्वाचा रोल होता. याशिवाय “हे राम’चे राईटसही शाहरुखच्याच “रेड चिली एन्टरटेनमेंट’कडे आहेत. आता पुन्हा एकदा तमिळ सिनेमामध्ये काम करताना शाहरुखच्या वाट्याला चक्क व्हिलनचा रोल आला आहे. या व्हिलनला तब्बल 15 मिनिटांचा रोल मिळणार आहे. यात त्याला विजयबरोबर फायटिंगही करायची आहे. निर्मात्यांना या मुख्य व्हिलनच्या रोलसाठी हिंदीतील बडा ऍक्‍टर पाहिजे होता. तेंव्हा शाहरुखला विचारल्यावर त्याने हा प्रस्ताव लगेच मान्य केला. कारण केवळ 4-5 दिवसांच्या शूटिंगमुळे त्याला काही फरक पडणार नाही.

त्यातही शाहरुखच्या करिअरचा ग्राफ सध्या फारसा काही ठिक चाललेला नाही. गेल्या 2 वर्षात किंग खानचे बहुतेक सिनेमे बॉक्‍स ऑफिसवर आपटले आहेत. पण आजही त्याच्य फॅन फॉलोअर्सची संख्या कमी झालेली नाही. आता सध्या तो दुबईच्या पर्यटन विभागाचे ऍम्बेसेडरपद सांभाळतो आहे. पण लवकरच त्याला मोठ्या प्रोजेक्‍टसह पुनरागमन करायचे आहे. त्यासाठी थोडे स्थिरस्थावर व्हायला पाहिजे. म्हणून हा व्हिलनचा रोल त्याने स्वीकारला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.