शिवराज सिंह चौहान यांची जिल्हा अधिकाऱ्याला धमकी

मध्य प्रदेश – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभा निवणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्हा अधिकाऱ्याला धमकीवजा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवराज सिंह चौहान छिंदवाड्यातील उमरेठ या गावात  हेलीकॉप्टरद्वारे जाणार होते मात्र , या  हेलीकॉप्टरला उतरवण्याची परवानगी तेथील जिल्हा अधिकाऱ्याने मंजूर केली नाही. यामुळे  शिवराज सिंह चौहान हे उमरेठ या गावात हायवेद्वारे पोहचले. त्यांनी जनसभेत जिल्हा अधिकाऱ्याला धमकी दिली की, ‘पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी हेलीकॉप्टरला उतरवण्याची परवानगी देत नव्हत्या, आता कमल नाथ दादा देखील असेच करत आहेत. पण ये ‘पिट्ठू’ कलेक्टर तू ऐकून घे आमची पण वेळ येणार आहे.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)