… अन् सनीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले

सनी लिओनीने बॉलीवूडमध्ये कितीही चांगले काम केले तरी तिच्या नावापुढे लागलेला “पोर्न स्टार’चा टॅग काही केल्या हटायला तयार नाही. 2013 मध्ये “जिस्म 2’मधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तरी तिच्या करिअरचा पूर्वीचा डार्क पॅच तिला अजूनही त्रास देतो आहे. तिच्या करिअरवर आता बायोपिकही येऊन गेला. त्याचा सिक्‍वेलही लवकरच वेबसिरीजच्या माध्यमातून येतो आहे. त्यातही तिच्या या प्रवासाची कारणे प्रेक्षकांपुढे येऊन गेलेली आहेत. पण तरीही तिला ट्रोल करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. पोर्नस्टार म्हणून चिडवण्यात लोकांना विकृत आनंदच वाटतो आहे. अरबाझ खानच्या एका शोमध्ये तिने आपल्या भावना मोकळ्या करून दिल्या. हा एक चॅट शो होता, त्यामध्ये करिअरच्या विविध टप्प्यांबाबत मनमोकळी चर्चा करत असताना “पोर्न इंडस्ट्री’चा उल्लेख आला आणि अचानक सनीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले.

तिला सावरायला थोडा वेळही लागला. या शो मध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटीजना सोशल मीडियावरच्या कॉमेंटना उत्तर द्यायचे असते. एका नेट युजरने सनीला उद्देशून लिहिले होते, सनीने “पोर्न इंडस्ट्री सोडण्याचे कारण म्हणजे पोर्नोग्राफीवर बंदी येणार हे तिला माहिती होते. म्हणूनच समजुतदारपणे तिने आपले करिअर बदलले.’ त्या खोचक प्रश्‍नाला सनीने तेवढ्याच समर्थपणे उत्तर दिले. “बरोबर आहे, मला दूरदृष्टी आहे. म्हणूनच मी योग्य निर्णय घेतला. मला ट्रोल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या ट्रोलिंगमुळे खूप छान वाटते आहे. कारण तुम्ही माझ्या वेबसाईटवर किती वेळ घालवता हे मला माहिती आहे.’

पूर्वी त्यावेळी पोर्न इंडस्ट्रीम्ध्ये काम करणे मला योग्य वाटले. तो निर्णय मी घेतला होता. आता त्याबद्दल कोणताही पश्‍चाताप करण्याची वेळ नाही. आता मी वर्तमानकाळात रहाते आहे आणि मला वर्तमानाचेच भान आहे, असे सनीने दिलेले उत्तर एकदम परफेक्‍ट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.