पिंपरी – गॅस एजन्सीचा टेम्पो पार्क करण्यासाठी दरमहा दहा हजार रुपयांचा हफ्ता देण्याची मागणी करत व्यावसायिकाला धमकविण्यात आल्याचा नेहरुनगर, पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी अमोल भागवत विधाते (वय-36 रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून सरदार रविंदर सिंग (वय -48 रा. दोपाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल यांची नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ गॅस एजन्सी आहे. रस्त्यावर टेम्पो पार्क करत असल्याच्या कारणावरून सिंग याने येथे गाडी का लावतोस? म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी 50 हजार रुपये मागितले तसेच दरमहा 10 हजार रुपयांचा हफ्ता द्यावा लागेल, अन्यथा एजन्सीवर कारवाई करु, अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.