कोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग

पिंपरी – गळयावर कोयता ठेऊन तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 15) दुपारी अडीचच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडला. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज चंद्रकांत कुऱ्हाडे (पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरात एकटी असताना आरोपी सूरज हा तिच्या घरात घुसला. त्याने तरुणीच्या गळ्यावर कोयता ठेऊन तू ओरडलीस तर तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी देत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या डोक्‍यात कोयत्याने वार केला. यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.