बीड – बीड जिल्ह्यातील सिरसाळा गावातील एका मैदानाच्या जमिनीतून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सिरसाळा येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक पसरलेला लाव्हासदृश्य पदार्थ पाहण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.
मात्र, या घटनेची प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी हा प्रकार विजेची तार पडल्याने झाला असल्याचे सांगितले. काल संध्याकाळी या भागात जोरदार पाऊस झाला. याचदरम्यान ही विजेची तार पडली असल्याचे बोलले जात आहे.