अनुराग कश्यपची पंतप्रधान म्हणून यांना पसंती

मुंबई – लोकसभा निवडणुकीमुळे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सगळीकडेच राजकीय चर्चा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार देखील मनमोकळेपणाने आपले राजकीय विचार सोशल माध्यमांवर जाहीर करत आहेत. सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी देखील आपल्या ट्विटर खात्यावरून आगामी लोकसभा निवडणूक आणि राजकीय विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये अनुराग कश्यपने नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षामध्येच पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदींना चांगले पर्याय असू शकतात असे अनुराग कश्यपने म्हंटले आहे.

तसेच भारतीय राजकारणाबद्दल लिहीत अनुराग कश्यपने, भारतीय राजकारणातून भ्रष्टाचार सोडून सर्व काही संपवता येईल असे म्हंटले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.