Aam Adami Party । लोकसभा निवडणुकीची उत्सुकता सातत्याने वाढत आहे. राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात जोमाने गुंतले आहेत. यासोबतच राजकीय पक्षांमधील नेत्यांच्या पक्षांतराची प्रक्रियाही सुरू झालीय. दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाच्या पंजाबमधील आमदार शीतल अंगुरल आणि खासदार सुशील कुमार रिंकू भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येतंय.
काँग्रेस आमदार, खासदारांचीही पक्षाला सोडचिट्ठी Aam Adami Party ।
गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे माजी आमदार, विद्यमान खासदार आणि आमदारांनीही पक्ष सोडला आहे. फतेहगड साहिबचे माजी आमदार गुरप्रीत सिंग जेपी यांनी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. तर खासदार प्रनीत कौर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय काल, शुक्रवारी आमदार राजकुमार चब्बेवाल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
माजी आमदार गुरप्रीत सिंग जेपी यांनी ९ मार्च रोजी आपमध्ये प्रवेश केला होता. १४ मार्च रोजी त्यांना फतेहगढ साहिबमधून लोकसभेचे तिकीट मिळाले होते. त्याचवेळी काँग्रेसचे आमदार राजकुमार चब्बेवाल यांना लोकसभेचे तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे.
‘आप’कडून 8 जागांसाठी उमेदवार जाहीर Aam Adami Party ।
पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. त्यापैकी आम आदमी पक्षाने आठ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने आपले पाच मंत्री उभे केले आहेत. ज्यामध्ये खादूर साहिबचे लालजीत भुल्लर, भटिंडाचे गुरमीत सिंग खुडियान, पटियालाचे डॉ. बलबीर सिंग, संगरूरचे गुरमीत सिंग मीत हैर आणि अमृतसरचे कुलदीप धालीवाल यांची नावे आहेत.
जालंधरचे विद्यमान खासदार सुशील रिंकू पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. तर पंजाबमध्ये ‘आप’ सक्रिय अवस्थेत दिसत आहे. मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये अनेक सभा घेतल्या आहेत.