पुणे – उत्तरेत पडलेल्या दाट धुक्यामुळे सलग पाचव्या दिवशी पुण्यातील विमान सेवा विस्कळीत झाली. पुण्यात येणारी आणि जाणारी अशी 10 विमाने गुरूवारी रद्द झाली. त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबाद, बंगळूर, गुवाहटी, कोलकत्ता, गोवा आणि कर्नाटकला येणारी व जाणारी विमाने रद्द झाली. तर अन्य मार्गावरील विमानसेवेला उशीर झाला.
देशाच्या वेगवेगळ्या भागात कडाक्याची थंडी असून दाट धुके पडलेले आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांमधील विमान सेवा गडबडली आहे. आठवड्याभरात पुण्यात येणारी आणि जाणारी अशी 60 ते 70 विमाने रद्द झाली आहेत. तर, अनेक विमानांना उशीर झाला आहे. यामध्ये गुरूवारी पुण्यात येणारी सहा आणि पुण्यातून जाणारी सहा अशी 12 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. सतत विमाने रद्द आणि उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.