Shweta Tiwari – अभिनेत्री श्वेता तिवारीला परिचयाची गरज नाही. तिचे नाव आता एक ब्रँड आहे. ‘कसौटी जिंदगी के’ मधील प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारून तिने घराघरात आपले नाव कमावले. ‘मैं हूं अपराजिता’ने तिने रातोरात प्रसिद्धी मिळवली. श्वेताने सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ जिंकला. ती नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते, अशात आता श्वेता तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
श्वेता तिवारी रोहित शेट्टीची पहिली वेब सीरिज इंडियन पोलीस फोर्सचा एक भाग आहे, शोचा एक भाग असण्याबद्दल श्वेता म्हणाली, “सर्वप्रथम, रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्सचा भाग बनणे हा सन्मान होता. ऑफिसमधून मला पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी लगेच हो म्हटलं.
श्वेता तिवारीने खत्रो के खिलाडी १२ मध्ये भाग घेतला तेव्हा तिला रोहित शेट्टीची भीती कशी वाटायची असेही सांगितले. ‘मी त्याला पहिल्यांदा KKK दरम्यान भेटले होते त्यावेळी मला त्याची भीती वाटत होती.
ती पुढे म्हणाली,’जेव्हा तुम्ही चित्रपटसृष्टीतील लोकांना भेटता तेव्हा कधी-कधी त्यांना तुम्ही लहान आहात किंवा तुम्ही टीव्हीवरील आहात असे वाटू लागते. पण या सेटवर सगळ्यांना सारखाच मान होता, समान किंमत होती. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. रोहित शेट्टीने कधीच भेदभाव केला नाही.’