Indigo : जर तुम्ही विमान प्रवास करणार असाल तर इंडिगो कामापनीने तुम्हाला एक आनंदाची बातमी दिली आहे. करा येत्या काही दिवसांमध्ये विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. देशातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने हवाई इंधनाच्या किंमती कमी केल्यानंतर इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेण्याचा निर्णंय घेतला आहे.
एटीएफच्या किंमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर, इंडिगोने ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या आहेत. त्याचा फायदा इंडिगोने हवाई प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंधन शुल्क कमी करण्याच्या निर्णयावर इंडिगोने सांगितले की, एटीएफच्या किमती डायनॅमिक आहेत. आम्ही आमचे भाडे आणि घटक बदलत राहू. इंडिगोने म्हटले आहे की, एअरलाइन आपल्या ग्राहकांना परवडणारी, वेळेवर, विनम्र आणि त्रासमुक्त प्रवास देण्याच्या आपल्या वचनाशी वचनबद्ध आहे.” असे म्हटले आहे.
तसेच हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर, इंडिगोने ऑक्टोबर 2023 मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर 300 ते 1,000 रुपयांपर्यंत इंधन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 जानेवारी 2024 पासून हवाई इंधनाच्या किमती 4 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंडिगोने इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.