85th Senior Nationals Badminton Championship 2023 at Guwahati : कॉमनवेल्थ गेम्स विजेता लक्ष्य सेनचा मोठा भाऊ चिराग सेन याने रविवारी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत तेलंगणाच्या तरुण एमचा 21-14, 13-21, 21-9 असा पराभव करून राष्ट्रीय विजेता होण्याचा मान मिळविला आहे. तरूणने दुसरा गेम जिंकून पुनरागमन केले, मात्र निर्णायक गेममध्ये चिरागने तरुणाला एकही संधी दिली नाही आणि विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय अजिंक्यपद विजेतेपद पटकावणारा अल्मोडाचा चिराग हा उत्तराखंडचा पहिला बॅडमिंटनपटू आहे.
दुसरीकडे हरियाणाच्या अनमोल खरब हिने पंजाबच्या तन्वी शर्माचा 15-21, 21-17, 16-8 असा पराभव करून महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. दोन्ही शटलर प्रथमच राष्ट्रीय विजेते ठरले आहेत.
लक्ष्य हा 85 व्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोच्च मानांकित होता, त्याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र बिगरमानांकित चिरागने आपल्या लहान भावाच्या पराभवाची भरपाई करून विजेतेपद पटकावले. विजेता झाल्यानंतर त्याला 3.25 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
ओडिशा मास्टर्स विजेते ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो या जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी नितीन आणि नवधा यांचा 21-13, 21-8 असा पराभव केला.