चेन्नई – ईडीच्या एका अधिकाऱ्याला २० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अंकित तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याची पुढील चौकशी करणाऱ्या तामिळनाडू प्रशासनातील अधिकाऱ्यांना ईडीने अटकाव केल्याने सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ईडीच्याच १५ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडून तामिळनाडु सरकारने ईडीचीच कोंडी केली आहे आणि आता ईडीच्या पंधरा अधिकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदवण्यात आल्याने तामिळनाडू विरूद्ध केंद्र सरकर असे स्वरूप या संघर्षाला मिळाले आहे.
ईडीचा अधिकारी अंकित तिवारी याला २० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई तामिळनाडु सरकारने केली आहे. या प्रकरणात तपास करण्यासाठी तामिळनाडुच्या डीव्हीएसी विभागाचे अधिकारी मदुराईच्या झोनल ऑफीसच्या आवारात गेले असताना ईडीच्या अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.