Salaar Advance Booking: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या ‘सालार: पार्ट वन – सीझफायर’ या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. प्रभासचा अदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करू शकला नव्हता. या चित्रपटात त्याने रामाची भूमिका साकारली होती. मात्र त्याच्यासह यातील इतर भूमिकांवर देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता चाहते प्रभासच्या आगामी ‘सालार’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापूर्वी या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे.
विशेष म्हणजे सालार चित्रपटाचे पहिले तिकीट दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी खरेदी केले आहे. तिकीट खरेदी केल्यानंतर एसएस राजामौली यांनी ‘सालार’च्या कलाकारांसोबत फोटो देखील जो निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्ट केलेल्या चित्रात एसएस राजामौली ‘सलार’च्या निर्मात्या आणि कलाकारांसोबत दिसत आहेत. फोटोमध्ये चित्रपटाचे मुख्य कलाकार प्रभास, प्रशांत नील आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसत आहेत.
Legendary Director @ssrajamouli garu buys the first ticket for #SalaarCeaseFire in Nizam 🎟️
Nizam grand release by @MythriOfficial 💥#Salaar #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @VKiragandur @ChaluveG @hombalefilms #HombaleMusic @IamJagguBhai @sriyareddy… pic.twitter.com/2de2BNWBqQ
— Hombale Films (@hombalefilms) December 16, 2023
सॅकनिल्कच्या एका रिपोर्टनुसार, तेलुगू भाषेत सर्वाधिक तिकीटांची बुकींग झाली आहे. आतापर्यत सालारचे 22 हजार 117 तिकीट अॅडव्हान्स बुक झाले असून 49 लाख 35 हजारांची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता हा चित्रपट 22 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘डंकी’सोबत रिलीज होणार होता. पण आता ‘डंकी’ 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सालारचे दिग्दर्शन केले आहे.