मुंबई – साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहे, लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतातच पण काहीजण त्यांची पूजाही करतात. अशातच एकदा श्रीदेवीने त्याच्यासोबत असे काही केले की तिथे उपस्थित सर्वजण थक्क झाले. श्रीदेवीबद्दल रजनीकांतची को-स्टारच नाही तर खूप चांगली मैत्रीणही होती. एका चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवीने रजनीकांतच्या चेहऱ्यावर थुंकले, त्यावेळी ते पाहून सगळेच थक्क झाले.
’16 Vayathinile’ या तमिळ चित्रपटाच्या सेटवरील हा किस्सा आहे. या चित्रपटात श्रीदेवी, कमल हासन आणि रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. 1977 मध्ये आलेल्या या चित्रपटात रजनीकांत खलनायकाच्या भूमिकेत होता आणि त्यांच्या पात्राचे नाव होते पराताई. या चित्रपटात एक सीन होता ज्यामध्ये श्रीदेवीला रजनीकांतवर थुंकावे लागले होते, पण रजनीकांत हे श्रीदेवीपेक्षा वयाने खूप मोठे असल्याने आणि ते मोठे स्टार देखील असल्याने श्रीदेवी हा सीन करायला खूप कचरत होती.
हा सीन शूट करण्यासाठी श्रीदेवीने अनेक टेक घेतले. श्रीदेवीला अस्वस्थ वाटू लागल्याने रजनीकांतने तिला समजावून सांगितले आणि मग श्रीदेवीने दिग्दर्शकाला हवे तेच केले. पण श्रीदेवी रजनीकांतवर अशा प्रकारे थुंकताना पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले. ‘प्राइड ऑफ तमिळ सिनेमा’ नावाच्या पुस्तकातही या घटनेचा उल्लेख आहे. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला, यानंतरही श्रीदेवी आणि रजनीकांत यांनी अनेक चित्रपट केले.