‘अजिंक्य अमुचे स्वराज्य किल्ले’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
पिरंगुट – जेव्हा जेव्हा आयुष्यात मोठी संकटे उभी राहतील तेव्हा तेव्हा गडकोट व छत्रपती शिवरायांचे स्मरण करा. नक्कीच संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, असे मत अभिनेते अजय तपकिरे यांनी व्यक्त केले.
सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘अजिंक्य अमुचे स्वराज्य किल्ले’ या तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने लावण्यात आलेल्या वस्तू व चित्र प्रदर्शनी पाहण्यासाठी तालुक्यातील विविध शाळा व नागरिकांनी गर्दी केली होती. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्य साधत प्रबोधिनीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ४४ गावांतील ३६६ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रबोधिनीच्या वतीने मुळशी तालुक्यातील आठ सरदार घराण्याच्या प्रतिनिधीचा देखील गौरव करण्यात आला.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सविता दगडे, महादेव कोंढरे, शंकर मांडेकर, रवींद्र कंधारे, राजेंद्र बांदल, दीपक करंजावणे, राम गायकवाड, जितेंद्र इंगवले, स्वाती ढमाले उपस्थित होते. बक्षीस वितरणप्रसंगी उद्योजक चिंतामणी चितळे, सरपंच चांगदेव पवळे, प्रबोधिनीचे संस्थापक ज्ञानेश्वर पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, स्वाती गोळे, राजाभाऊ पासलकर,
सत्यशील ढमाले, संदीप पोतनीस, मारुती गोळे, प्रमोद बलकवडे, राजेंद्र मारणे, यश बांदल, बंडूशेठ जोरी, रामभाऊ पवळे, कालिदास शेडगे, रवींद्र मोहोळ, सुभाष माझिरे, राहुल पवळे, सागर पवळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पवळे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र नाईकरे, प्रदीप पाटील, योगेश गोसावी यांनी केले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष माऊली तापकीर आभार यांनी मानले.
विजेते स्पर्धक –
शालेय गट (वैयक्तिक) – करण ववले – भरे (प्रथम), साईनाथ माझिरे – भुकूम, प्रथमेश सांगळे – भुगाव (द्वितीय), ऋतुजा पवळे, वैष्णवी सुतार – सुतारवाडी, सार्थक खडके – पिरंगुट (तृतीय).
शालेय गट (सांघिक) – काळभैरवनाथ ग्रुप मुलखेड (प्रथम), सहयाद्री तरुण मंडळ – अमराळेवाडी, शिवराय प्रतिष्ठान मुलखेड (द्वितीय), मोरया मित्र मंडळ कनक प्लाझा – पिरंगुट, संस्कार सुतार, मृण्मयी सुतार –सुतारवाडी (तृतीय)
खुला गट (वैयक्तिक) – आदित्य शेलार – बोतरवाडी (प्रथम), शुभम सातव – लवळे (द्वितीय), तुषार शेडगे – भुगाव, हर्षल कांबळे – पिरंगुट (तृतीय).
खुला गट ( सांघिक) – गोकुळपुरा मित्र मंडळ, पौड (प्रथम), एच. एन. बॉईज हिरासनगर पिरंगुट (द्वितीय), विघ्नहर्ता मित्र मंडळ लवळे, विघ्नहर्ता मित्र मंडळ भुगाव (तृतीय).