Pawan Munjal : ऑटोमोबाईल कंपनी हीरो मोटोकॉर्टचे सीएमडी आणि चेअरमन पवन मुंजाल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण ईडीने(अंमलबजावणी संचालनालय ) त्याच्या दिल्लीतील 3 मालमत्ता जप्त केल्या आहेत. पवन मुंजाल यांची तब्बल 25 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पवन मुंजाल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ईडीने मुंजाल यांची सुमारे 50 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी, 1 ऑगस्ट 2023 रोजी, एजन्सीने दिल्ली आणि गुरुग्राममधील मुंजालच्या 12 ठिकाणी छापे टाकले होते, ज्यामध्ये 25 कोटी रुपयांचे विदेशी चलन, सोने आणि दागिने जप्त करण्यात आले होते.
डीआरआयने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे एजन्सीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि आयपीसी अंतर्गत छापा टाकण्यात आला होता. पवन मुंजाल व्यतिरिक्त सॉल्ट एक्सपिरियन्स अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (SEMPL) च्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. असा आरोप आहे की SEMPL ने 2014-15 ते 2018-19 या वर्षात सुमारे 54 कोटी रुपयांचे विदेशी चलन विदेशात नेले, जे पवन मुंजाल यांच्यासाठी खर्च करण्यात आले.
SEMPL ने आपल्या कर्मचार्यांच्या नावे परकीय चलनातून 14 कोटी रुपयांचे विदेशी चलन घेतल्याचे या प्रकरणाच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात हेमंत दहिया, मुदित अग्रवाल, अमित मक्कर, गौतम कुमार, विक्रम बजाज आणि केतन कक्कर यांची नावे समोर आली होती. तपासात असेही समोर आले आहे की कंपनीने परदेशात कधीही प्रवास न केलेल्या इतर कर्मचार्यांच्या नावे परकीय चलन/ट्रॅव्हल फॉरेक्स कार्ड मिळवले होते.