drug smuggling – पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहानंतर (Yerwada Jail) आता येथील आर्थर रोड (Arthur Road Jail) मध्यवर्ती कारागृहातील एका पोलीस हवालदाराला कारागृहात कैद्यांना ड्रग्ज तस्करी (drug smuggling) केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
वीरेंद्र नाईक असे या पोलीस हवालदाराच नाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. वीरेंद्र नाईक याला कारागृहात 71 ग्रॅम चरसची तस्करी करताना पकडण्यात आल आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहासह ससुन रुग्णालयात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली होती. पण कारागृहातील तस्करीत आता पोलीसांचाच समावेश असल्याची धक्कादायक बाब देखील उघडकीस येत आहे.
या पोलीस हवालदाराविरोधात एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वय एन.एम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस हवालदार नाईक याला आर्थर रोड कारागृहाच्या चेकिंग गेटवर पकडण्यात आले.
त्यावेळी त्याने चरसच्या कॅप्सूल पॅक करुन त्याच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवल्या होत्या. त्याच्याकडे झडतीत सुमारे पाच कॅप्सूल सापडले. त्यामुळे त्याला कारागृहातील इतर पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली.
पण त्यावेळी हवालदार नाईक याने त्याला तपासणाऱ्या पोलीस हवालदाराच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य गेटवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. दरम्यान पोलीस हवालदार नाईकला न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपी आरोपी नाईक हा आर्थर रोड कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याला ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.