#CWC2023 IND vs AUS Live Score : कर्णधार रोहित शर्माच्या भारतीय संघाची एकदिवसीय विश्वचषक मोहीमेस आजपासून सुरूवात झाली आहे. भारतापुढे पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माने मोडला अझरुद्दीनचा विक्रम…
भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. या सामन्यात सहभागी होऊन कर्णधार रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार म्हणून प्रवेश केलेला रोहित शर्मा आता विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीन या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. या सामन्यात प्रवेश करताना रोहितचे 8 ऑक्टोबर 2023 रोजी वय 36 वर्षे 161 दिवस आहे.
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss and elect to bat.
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/3BxcFfqWnX
— BCCI (@BCCI) October 8, 2023
दरम्यान, याआधी मोहम्मद अझरुद्दीन हे विश्वचषकात भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार होते. त्यांनी 1999 च्या विश्वचषकात 36 वर्षे 124 दिवस वय असताना भारताचे नेतृत्व केले होते. त्यानंतर 24 वर्षांनंतर रोहित शर्माने अझरुद्दीनला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. सौरव गांगुली, राहुल द्रविड, एम.एस. धोनी, विराट कोहली हे विश्वचषकात कर्णधार झाले पण ते अझरुद्दीनचा सर्वात जास्त वयाचा विक्रम मोडू शकले नाहीत.
विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सर्वात वयस्कर कर्णधार..
रोहित शर्मा (2023) : 36 वर्षे 161 दिवस
एम अझरुद्दीन (1999) : 36 वर्षे 124 दिवस
राहुल द्रविड (2007) : 34 वर्षे 71 दिवस
एस वेंकटराघवन (1979) : 34 वर्षे 56 दिवस
एमएस धोनी (2015) : 33 वर्षे 262 दिवस
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 150 वा सामना..
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा 150 वा एकदिवसीय सामना आहे. कोणत्याही एका संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची ही भारताची दुसरी सर्वाधिक संख्या आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताने श्रीलंकेविरुद्ध 167 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर तर वेस्ट इंडिजचा संघ 142 वनडेसह तिस-या स्थानावर आहे.
कोहलीने मोडला कुंबळेचा विक्रम…
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने स्फोटक फलंदाज मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्शलचा विराट कोहलीने अप्रतिम झेल घेतला. यासह विश्वचषकातील भारताच्या पहिल्याच सामन्यात पहिला झेल घेत कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा तो बिगर विकेटकीपर भारतीय क्षेत्ररक्षक बनला. कोहलीने या प्रकरणात माजी गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. माजी कर्णधार विराटने विश्वचषकातील 15वा झेल घेतला. याआधी कुंबळे सर्वाधिक झेल घेणारा बिगर विकेटकीपर क्षेत्ररक्षक होता. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.