बॅंकॉक – म्यानमारमध्ये सीमा भागातील पोलीस ठाण्यावर बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये किमान 6 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह एकूण 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय एक जिल्हा प्रशासकीय अधिकारीदेखील या हल्ल्यामध्ये मारला गेला आहे.
रविवारी संध्याकाळी झालेला हा हल्ला दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी म्यानमारच्या लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता, असे मानले जाते आहे. बंड करणाऱ्या लष्कराविरोधात पहिले काही दिवस शांततेने आंदोलन झाले होते.
मात्र नंतर लष्कराने दडपशाही करायला सुरुवात केल्यावर अनेक सशस्त्र गट स्थापन झाले आणि लष्कराविरोधात “पीपल्स डिफेन्स फोर्स’ नावाचा सशस्त्र बंडखोरांचा गट स्थापन केला गेला.
हे दल म्हणजे म्यानमारमध्ये पदच्युत करण्यात आलेल्या सरकारचे समर्थन करणारे दल मानले जाते आहे. या सशस्त्र बंडखोरांच्या दलानेच सीमा भागातील पोलीस स्थानकावरड्रोन हल्ला केल्याची जबाबदारी स्विकारली आहे.