मुंबई – सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे, तर काही राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, राजधानी दिल्लीत बुधवारी दिवसा ढगाळ वातावरण असेल आणि रात्री हलका पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील विदर्भात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या पावसानंतर सध्या वातावरण अल्हाददायक आहे. याशिवाय उत्तर भारत, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दिल्लीत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सोमवारी दिल्लीत कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे सामान्य तापमानापेक्षा सहा अंशांनी जास्त आहे. दुसरी राज्यातील विदर्भासह चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांत हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भात बुधवारसाठी यलो अलर्ट असणार आहे. तर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट राहणार आहे. उत्तराखंडला मुसळधारीचा इशारा उत्तराखंडमधील हवामान देखील बदलले आहे. जवळपास आठवडाभरानंतर डेहराडूनमध्ये जोरदार पाऊस झाला आणि मसुरीमध्येही ढग दाटून आले, त्यानंतर लोकांना दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने बागेश्वर, पिथौरागढ, अल्मोडा आणि चंपावत जिल्ह्यात 6 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय उत्तर भारत, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारपासून ईशान्य भारत, मध्य प्रदेशतही मुसळधार पाऊस पडणार आहे.